शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळ परिसरातील उंच इमारतींवर चालणार हातोडा, यादी तयार

By पोपट केशव पवार | Updated: June 14, 2025 12:45 IST

विनापरवानगी बांधकाम

पोपट पवारकोल्हापूर : कोल्हापूरविमानतळशेजारील गावांमध्ये काही इमारतींची उंची अनधिकृतपणे वाढवली गेल्याने या इमारती विमानाला अडथळा ठरत आहेत. अशा इमारतींची यादी विमानतळ प्राधिकरणाने संकलित केली असून त्यावर लवकरच कारवाई केली जाणार आहे. तशी प्रक्रियाही विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.कोल्हापूर विमानतळ उजळाईवाडी गावच्या हद्दीत येत असून या विमानतळाशेजारील सरनोबतवाडी, विकासवाडी, गाेकूळशिरगाव, नेर्ली, तामगाव, हलसवडे व गडमुडशिंगी या गावची जमीन संपादित केली आहे. सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी २,३०० मीटर करण्यात येत आहे. हीच धावपट्टी काही दिवसांत ३ हजार मीटर करण्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रकिया सुरू आहे. त्यामुळे धावपट्टी वाढल्यानंतर विमानाला टेकऑफ किंवा लँडिंग करताना शेजारील इमारतींच्या उंचीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.विमान उतरताना किंवा झेपावताना उंच इमारतीच्या अडथळ्यामुळे अनेकदा विमानांचे अपघात झाले आहेत. हे टाळण्यासाठी विमानतळ परिसरातील इमारतींच्या उंचीला मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करुन इमारती बांधल्या जातात. कोल्हापूर विमानतळाशेजारील गावांमध्ये अशा अडथळा ठरणाऱ्या इमारती किती आहेत याची माहिती प्रशासनाने संकलित केली आहे.विनापरवानगी बांधकामविमान उतरताना किंवा झेपावताना उंच इमारतींचा वैमानिकाला अडथळा येतो. त्यामुळे अशा इमारतींना लाल, पांढरे पट्टे मारले जातात. मात्र, अनेकदा हे पट्टेही दिसून येत नाहीत. विशिष्ठ उंचीच्या नंतर बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, अनेकदा ही परवानगी न घेताच इमारती बांधल्या जातात. कोल्हापूर विमानतळाशेजारी उंच इमारती बांधताना अनेकांनी एअरपोर्ट ॲथॉरिटीची परवानगी घेतली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नेमक्या अशा अडथळा ठरणाऱ्या किती इमारती आहेत हे सांगण्यास मात्र प्रशासनाने नकार दिला.

विमानतळाचा विस्तार होण्याआधी एअरपोर्ट ॲथॉरिटीची परवानगी घेऊन उंच इमारती बांधल्या असतील तर या इमारती पाडताना त्याची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी. परवानगी न घेता बांधलेल्या उंच इमारतींवर कारवाई व्हावी. - के.पी. खोत, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर. 

कोल्हापूर विमानतळाशेजारी विमानाला अडथळा ठरणाऱ्या किती इमारती आहेत याची माहिती आम्ही संकलित केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करणार आहोत. - अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण.