‘महसूल’मधील घोटाळेबाजांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:18 IST2021-07-20T04:18:35+5:302021-07-20T04:18:35+5:30
‘महसूल’मधील वरील गैरप्रकारांबाबत कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून त्याविरोधात आवाज उठविला होता. या भ्रष्ट कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा शासकीय ...

‘महसूल’मधील घोटाळेबाजांवर कारवाई करणार
‘महसूल’मधील वरील गैरप्रकारांबाबत कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून त्याविरोधात आवाज उठविला होता. या भ्रष्ट कारभारामुळे कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचेही निदर्शनास आणून दिल्या होत्या. या अनुशंगाने सोमवारी प्रांत कार्यालयात बैठक झाली. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी आजही असे बनावट दस्ताची आदेश शासकीय व्यवहारात निदर्शनास येत आहेत. या आदेशांना पायबंद घालण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असा आग्रह धरला. यावेळी रमेश मोरे, अशोक पवार, अजित सासने, भाऊ घोडके. चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
---
फोटो नं १९०७२०२१-कोल-करवीर बैठक
ओळ : कोल्हापुरातील करवीर प्रांत कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला महसूलमधील घोटाळेबाजांवर कारवाईचे आश्वासन दिले.
---