वडगावात जुगार खेळताना कारवाई : १९ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:25+5:302021-07-10T04:18:25+5:30
याप्रकरणी विशाल विनायक माने, अविनाश अनिल माने, सागर जयसिंग साखळकर, विवेक विनायक माने, शिवप्रसाद मल्लाप्पा हंजगे, गोटूराम बहादूर चौगुले, ...

वडगावात जुगार खेळताना कारवाई : १९ अटकेत
याप्रकरणी विशाल विनायक माने, अविनाश अनिल माने, सागर जयसिंग साखळकर, विवेक विनायक माने, शिवप्रसाद मल्लाप्पा हंजगे, गोटूराम बहादूर चौगुले, राजेंद्र लालासो मोरे, वैभव राजू मोरे, नितीन लक्ष्मण सोनवणे, सदाशिव बबन सणगर, रमेश बाळू माने, अजित वसंत माने, धनवडे (पूर्ण नाव माहीत नाही सर्व, रा. पेठवडगाव), यशवंत नाना हराळे (हेरले), शिवाजी शामराव ठाणेकर (कसबा बावडा), धनाजी अन्नासो कारंडे (हातकणंगले), अनिल आप्पासो घाडगे (मिणचे) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद पोलीस नाईक रणवीर जाधव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : येथील सणगर गल्ली जवळ महालक्ष्मी सांस्कृतिक मंडळ आहे. येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करून तीनपानी जुगार खेळत असल्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. पोलीस अंमलदार दादा माने, संदीप गायकवाड, नरसिंह कुंभार, सतीश सुतार, उमेश धनवडे, आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस नाईक अमरसिंह पावरा करीत आहेत.