शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

कोल्हापूरात अवैध प्रवासी वाहतुकीवर आजपासून कारवाई

By admin | Updated: April 6, 2017 17:50 IST

महानगरपालिकेचे आश्वासन : चार पथके तयार, रिक्षा करणार जप्त

आॅनलाईन लोकमत  

कोल्हापूर, दि. ६ शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीस आळ घालण्यासाठी चार फिरती पथके तयार करण्यात आली असून आज, शुक्रवारपासून प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होईल, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी.टी.पवार यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाला दिले. अवैध वाहतुक करणारी वाहने जप्त करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जर येत्या पंधरा दिवसात अवैध प्रवासी वाहतुक रोखली नाही, तर मात्र आम्ही स्वत: रस्त्यांवर उतरुन कारवाई करु, असा इशारा महानगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी दिला. कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यापासून अवैध प्रवासी वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच शहर हद्दीत परवाना नसतानाही सहा आसनी रिक्षा वाहतुक सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी आणि केएमटी वाचवावी अशी मागणी करण्यासाठी महानगरपालिकेचे उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, नगरसेवक तौफीक मुल्लाणी,विजय खाडे, अभिजित चव्हाण, अशोक जाधव, प्रताप जाधव, सूरजंजिरी लाटकर, उमा बनसोडे, शोभा कवाळे, माधूरी लाड, प्रभारी अतिरीक्त वाहतुक व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डी. टी. पवार यांची भेट घेतली.

यावेळी स्वाभिमानी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. तीन केएमटी बसमधून हे सर्व जण प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहचले. ‘हटाव हटाव - वडाप हटाव’, ‘वडाप हटाव, केएमटी बचाव’ अशा घोषणा देतच सर्वजण डी. टी. पवार यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी पवार हे त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत बसले होते.

परिवहन सभापती खान, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, अशोक जाधव, सूमंजिरी लाटकर यांनी शिष्टमंडळ घेऊन येण्याचे कारण सांगितले. शहरात अवैध रिक्षा वाहतुक सुरु असल्याने केएमटी आर्थिक अडचणीत सापडली आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे. हजारो बेकायदेशीर रिक्षा शहरात फिरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे या अवैध प्रवासी वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

अडचणी येऊ नयेत : पवार

कारवाई करताना काय अडचणी येतात याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे कारवाई सुरु झाली की पुन्हा अशा अडचणी येऊ नयेत अशी अपेक्षा डी. टी.पवार यांनी व्यक्त केली. आम्ही अशा वडाप रिक्षा वाहतुकीला आळा घालण्याकरीता चार पथके तयार केली असून  शुक्रवारपासून ही कारवाई सुरु होईल. एक पथक कायमस्वरुपी तैनात केले जाईल. सहा आसनी रिक्षा तसेच आयुष्य संपलेल्या रिक्षा जप्त केल्या जातील, तसेच प्रत्येक आठवड्याला आढावा बैठक घेतली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

फोनवर दम देतात ...

प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करताना ‘आम्ही कारवाई सुरु केली की लगेच फोनवर दम दिला जातो. कारवाईत व्यत्यय आणला जातो. असा अनुभव येणार नाही याची दक्षता आपण सर्वजणांनी घ्यावी’, अशी विनंती केली. आम्ही अवैध प्रवासी वाहतुकीला कधीही पाठीशी घातले नाही, पण फोनवर दम दिल्याने त्यात खंड पडतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. त्याचवेळी त्यांना रोखत शारंगधर देशमुख यांनी त्यांना अशा कारवाईत आम्ही हस्तक्षेप करणार नाही, उलट आम्ही तुमच्या सोबतच राहू, असे सांगितले. पंधरा दिवसांची मुदत शहरातील वडाप वाहतुक बंद करण्यासाठी नगरसेवकांनी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. जर या पंधरा दिवसात वडाप पूर्णपणे बंद झाले नाही तर मात्र आम्ही सर्व नगररसेवक, केएमटीचे कर्मचारी रस्त्यावर उतरुन स्वत: कारवाई करणार असा इशारा यावेळी देण्यात आला.