पिसात्री ग्रामपंचायतीकडून गायरानमधील बांबूच्या काठ्या तोडल्याप्रकरणी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:49+5:302021-05-19T04:24:49+5:30
पिसात्री ग्रामपंचायतीमध्ये गायरान गट क्रमांक २०३ मध्ये ग्रामस्थांनी छप्पर बांधून तसेच कुंपण घालून जागा अडविण्याचा ...

पिसात्री ग्रामपंचायतीकडून गायरानमधील बांबूच्या काठ्या तोडल्याप्रकरणी कारवाई
पिसात्री ग्रामपंचायतीमध्ये गायरान गट क्रमांक २०३ मध्ये ग्रामस्थांनी छप्पर बांधून तसेच कुंपण घालून जागा अडविण्याचा सपाटा लावला आहे. एका एका कुटुंबाने एकर दीड एकर मोक्याच्या जागा हडप केल्या आहेत. त्यामुळे गतवर्षी ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांवर कारवाईची मोहीम तीव्र केली. छपरे काढून टाकण्यात आली. काही प्रमाणात जागा मोकळी केली. धनगरवाडाकडील गायरानमधील ग्रामस्थांनी स्वतःहून पिके घेतली नाहीत. त्यामुळे जनावरांना चरण्यासाठी मोकळी जागा मिळाली. गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला; परंतु सोनारवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवली. गायरानमधील गट क्रमांक २०३ मधील सर्व बाधित अतिक्रमण क्षेत्राचा तलाठी, पोलीस पाटील यांच्यासमवेत ग्रामपंचायतीने पंचनामा केला. पुन्हा अतिक्रमण करू नये. याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.