शिरोळमध्ये पालिका, पोलीस प्रशासनाकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:23 IST2021-04-07T04:23:47+5:302021-04-07T04:23:47+5:30
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई शिरोळ : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नवीन नियमावलीनुसार शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना ...

शिरोळमध्ये पालिका, पोलीस प्रशासनाकडून कारवाई
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
शिरोळ : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नवीन नियमावलीनुसार शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तसेच व्यापारी व व्यावसायिकांना कोरोनाचे नियम पाळण्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याबाबतचे आवाहनही पालिकेकडून करण्यात येत होते.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालिका व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. मंगळवारी शहरात सर्वच व्यवहार सुरू होते. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलिसांनी संयुक्तपणे शहरात नवीन नियमावलीचे पालन करण्याचे व्यावसायिकांना आवाहन केले. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.