इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन घेण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. असे असताना येथील काही इंग्लिश मीडियम शाळा सुरू केल्या आहे. शासनाचा आदेश डावलून सुरू असलेल्या या शाळा बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेने प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, शहरात काही इंग्लिश शाळांनी राज्य शासनाचे आदेश डावलत आर्थिक फायद्यासाठी शाळा सुरू ठेवल्या आहेत. पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती घालून संमतीपत्र घेत लहान मुलांच्या आरोग्याचा विचार न करता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू ठेवले आहेत, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सॅम आठवले, कृष्णा जावीर, महेश कांबळे, विजय कुरणे, अवधुत भोई, आनंदा नााईक, आदींचा समावेश होता.