गगनबावडा, असळज, निवडे येथे अवैध धंद्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST2021-07-22T04:16:29+5:302021-07-22T04:16:29+5:30
असळज येथे विनापरवाना मध्य विक्री प्रकरणी भरत शांताराम कांबळे (वय ३०, रा. असळज याच्याविरुद्ध गगनबावडा पोलिसांत गुन्हा ...

गगनबावडा, असळज, निवडे येथे अवैध धंद्यावर कारवाई
असळज येथे विनापरवाना मध्य विक्री प्रकरणी भरत शांताराम कांबळे (वय ३०, रा. असळज याच्याविरुद्ध गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कारवाई करून ६१८० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच मटक्याचा चिठ्ठ्या व रोख रुपये दोन हजार चारशे सत्तर रुपये असा एकूण ८६५१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल अमर मधुकर चव्हाण यांनी गगनबावडा पोलिसांत दिली असून, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम हे करीत आहेत, तर निवडे येथे अवैधपणे दारूची विक्री करण्यासाठी आणलेला मद्यसाठा जवळ बाळगल्याचे आढळून आल्याने सतीश विठ्ठल घाटगे (वय २४, रा. साखरी याच्याविरुद्ध गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल युवराज बोबडे यांनी गगनबावडा पोलिसांत दिली असून, अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल घाडगे करीत आहेत, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.