परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:52+5:302021-07-04T04:17:52+5:30
कोल्हापूर : सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालयाबाहेर जाणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांवर यापुढे प्रशासकीय कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य ...

परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास कारवाई
कोल्हापूर : सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालयाबाहेर जाणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांवर यापुढे प्रशासकीय कारवाई होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शनिवारी तसे आदेश काढले असून, खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी कोणाच्याही परवानगीशिवाय मुख्यालयाबाहेर जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विभागीय आयुक्तांच्या ऑनलाईन बैठकांना अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. आता तर विधीमंडळ अधिवेशन सुरु होत असल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तत्काळ उपलब्ध असणे गरजेचे आहे, पण यात हलगर्जीपणा दिसत असल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढत विनापरवानगी बाहेर जाणाऱ्यांना चाप लावला आहे. या आदेशाचे पालन बंधनकारक आहे, अन्यथा प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पंचायत समिती स्तरावरदेखील याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर तर जिल्हा परिषदेतील जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.