आणखी आठ मंगल कार्यालयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:39 IST2021-02-23T04:39:21+5:302021-02-23T04:39:21+5:30
कोल्हापूर : कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या आठ मंगल कार्यालये आणि अयोजकांवर सोमवारी महापालिका अग्निशमन विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. ...

आणखी आठ मंगल कार्यालयांवर कारवाई
कोल्हापूर : कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या आठ मंगल कार्यालये आणि अयोजकांवर सोमवारी महापालिका अग्निशमन विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आठ हजारांचा दंड वसूल केला. शहरातील प्रमुख हॉटेलमध्येही जाऊन समज देण्यात आली.
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असताना शहरातील काहींकडून मंगल कार्यालयांत मोठ्या प्रमाणात समारंभ घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. ५० लोकांवर उपस्थित असता कामा नये या नियमाचा भंग होत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अशा मंगल कार्यालये आणि आयोजकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेले दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन विभागचे पथक अशा मंगल कार्यालयांवर वॉच ठेवून आहे. सोमवारी कावळा नाका, ताराबाई पार्क, जरगनगर, उद्यमनगर परिसरातील १० मंगल कार्यालयांची तपासणी केली. यापैकी आठ मंगल कार्यालयांवर अग्निशमनचे स्टेशन अधिकारी जयवंत खोत यांनी कारवाई केली.
फोटो : २२०२०२१ कोल केएमसी कारवाई न्यूज
ओळी : कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असताना कोल्हापुरातील मंगल कार्यालयांमध्ये नियमांचा भंग होत असून, महापालिका अशांवर कारवाई करत आहे.