कृती समितीतर्फे खासबाग चौकात जागृती मेळावा

By Admin | Updated: May 26, 2014 01:13 IST2014-05-26T01:10:53+5:302014-05-26T01:13:49+5:30

९ जूनला टोलविरोधी तिसर्‍यांदा मोर्चा

Action Committee organized awareness rally in Alibag Chowk | कृती समितीतर्फे खासबाग चौकात जागृती मेळावा

कृती समितीतर्फे खासबाग चौकात जागृती मेळावा

 कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे टोलविरोधात ९ जूनला काढण्यात येणारा मोर्चा विक्रमी असेल. महामोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्धार आज (रविवार) खासबाग चौकात झालेल्या जागृती मेळाव्यात करण्यात आला.. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ जूनला टोलविरोधी तिसर्‍यांदा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढवून यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे शहरभर जागृती मेळावा घेऊन सहभाग नोंदविण्यासाठी सर्वसामान्यांना आवाहन करण्यात येत आहे. आज खासबाग चौकात परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, अशोक पोवार, संभागी जगदाळे, राजेंद्र कुरणे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Action Committee organized awareness rally in Alibag Chowk