केर्ली, नागदेववाडीत मटकाप्रकरणी तिघांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST2021-03-14T04:23:43+5:302021-03-14T04:23:43+5:30
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ली व नागदेववाडी येथे पोलिसांनी छापे टाकून मोबाईलवर कल्याण मटका घेणाऱ्या तिघांवर कारवाई केली. केर्ली ...

केर्ली, नागदेववाडीत मटकाप्रकरणी तिघांवर कारवाई
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ली व नागदेववाडी येथे पोलिसांनी छापे टाकून मोबाईलवर कल्याण मटका घेणाऱ्या तिघांवर कारवाई केली.
केर्ली ते पडवळवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून फोनवरुन कागदावर मटका लिहून घेत जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या शहाजी भगवान फडतरे (वय ४०, रा. केर्ली, ता. करवीर) याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून रोख रकमेसह १,२५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर नागदेववाडी (ता. करवीर) येथे पोलिसांनी छापा टाकून राहुल शिवाजी घाटगे (वय ३१, रा. पोवार गल्ली, लक्षतीर्थ वसाहत), महेश चौगुले (रा. शिवाजी पेठ) यांच्यावर कल्याण मटकाप्रकरणी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोख ८०० रुपयांसह एकूण २,३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.