शहरातील तीन पानपट्टी व्यावसायिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:27+5:302021-02-14T04:23:27+5:30
तारा राणी चौक परिसरातील अनिता पान शॉपवर अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त टी. एन. शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे, ...

शहरातील तीन पानपट्टी व्यावसायिकांवर कारवाई
तारा राणी चौक परिसरातील अनिता पान शॉपवर अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त टी. एन. शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णे, नमुना सहायक शिवाजी तोडकर यांनी छापा टाकून साठा केलेला १२ हजार ७२० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू जप्त केला. या प्रकरणी मधुसूदन नाईक, सोमेश चौगुले यांच्यावर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला. लक्ष्मीपुरी पानलाइन परिसरातील गोल्डन आणि बॉम्बे टोबॅको सेंटरवर अन्नसुरक्षा अधिकारी महेश मासाळ आणि रमाकांत पाटील यांच्या पथकाने छापा टाकला. गोल्डन टोबॅको सेंटरमधील १० हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. बॉम्बे टोबॅको सेंटरवरील छाप्यात १५ हजार ३०० रुपयांची इलायचीची पाकिटे जप्त केली. तर उमेश शेटे आणि संजय काजवे यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.