‘नो एंट्री’तून प्रवेश करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST2021-03-13T04:41:57+5:302021-03-13T04:41:57+5:30
वाहतूक शाखेने शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ३१ मार्ग एकेरी वाहतूक केले आहेत. मात्र, अनेक वाहनधारक या मार्गावरून उलट दिशेने ...

‘नो एंट्री’तून प्रवेश करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा
वाहतूक शाखेने शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ३१ मार्ग एकेरी वाहतूक केले आहेत. मात्र, अनेक वाहनधारक या मार्गावरून उलट दिशेने वाहने चालवून नियमभंग करीत आहेत. त्यासोबतच वाहतुकीला अडथळा होईल, असे वर्तन करीत आहेत. अशा ६२३ वाहनधारकांवर ९ ते ११ मार्च दरम्यान कारवाई केली. त्यात १ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनधारकांनी अशा पद्धतीने वाहने चालवून नियमभंग करू नये. नियमांचे पालन करून दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
फोटो : ११०३२०२१-कोल-ट्रॅफिक
आेळी : एकेरी मार्गावरून उलट दिशेने येऊन वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात गुरुवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली.