जयसिंगपुरात दहा जुगाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST2021-09-05T04:29:39+5:302021-09-05T04:29:39+5:30
जयसिंगपूर गल्ली नंबर १३ येथील दोन नंबर शाळेसमोर वडर गल्लीत तम्मा कलकुटगी यांच्या घरामध्ये छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ...

जयसिंगपुरात दहा जुगाऱ्यांवर कारवाई
जयसिंगपूर गल्ली नंबर १३ येथील दोन नंबर शाळेसमोर वडर गल्लीत तम्मा कलकुटगी यांच्या घरामध्ये छापा टाकून जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत १लाख ६३ हजार ३५) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शनिवारी सांयकाळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी हा छापा टाकला.
युनुस सय्यद घालाईत, सुनील दादासो फल्ले, देवराज बाबूराव माने (सर्व रा.शिरोळ), कुबेर नेमगोंडा पाटील (रा.कोथळी) , जगदीश सदानंद शेट्टी , गुराप्पा सीदराम हडपद , सदाशिव आण्णाप्पा गाडीवडर , गणेश रामचंद्र पवार , रमेश दशरथ कलकुटगी ( सर्व रा. जयसिंगपूर)अशी संशयित आरोपींची नावे आहेत. अवैध व्यवसायाविरोधात जयसिंगपूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे.