कबनूरमध्ये दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:30+5:302021-05-20T04:25:30+5:30
कबनूर : जिल्हाबंदी व कडक लॉकडाऊन असताना येथील अनेक व्यापारी दुकानांचे दरवाजे बंद करून आपला व्यवसाय करताना आढळून येत ...

कबनूरमध्ये दुकानदारांवर कारवाई
कबनूर : जिल्हाबंदी व कडक लॉकडाऊन असताना येथील अनेक व्यापारी दुकानांचे दरवाजे बंद करून आपला व्यवसाय करताना आढळून येत होते. सूचना देऊनही आपली आस्थापने बंद केली नाही. प्रांताधिकारी व शिवाजीनगर पोलिसांनी दार बंद करून सुरू असलेल्या अनेक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली.
गावामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १२५ वर गेला आहे. लॉकडाऊन आदेशाकडे दुर्लक्ष करून येथील नागरिक रस्त्यावर विनामास्क व विनाकारण फिरताना आढळून येते आहेत. किराणा दुकान, बेकरी, स्टेशनरी, ड्रायक्लिनर, भाजीपाला, चिकन दुकाने दरवाजे बंद करून व्यवहार करताना आढळून आले. बुधवारी सुरू असलेल्या बेकरी व आस्थापनांवर शिवाजीनगर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
लॉकडाउन कालावधीमध्ये कबनूर चौकातील लाँड्री दुकान सुरू ठेवल्याबद्दल प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी कारवाई केली. सदरचे दुकान लॉकडाउन कालावधी संपेपर्यंत सील करून १००० रुपयांचा दंड करण्यात आला व दुकानचालकास व कामगारास आरटीपीसीआर टेस्टसाठी पाठविण्यात आले. यावेळी तलाठी एस. डी. पाटील, सर्कल जे. आर. गोन्सालवीस व ग्रामविकास अधिकारी बी. टी. कुंभार होते.
फोटो ओळी
१९०५२०२१-आयसीएच-०३
कबनूर (ता. हातकणंगले) येथील फॅक्टरी रस्त्यावरील सुरू असलेल्या दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करून ते दुकान सील केले.