शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

विभागीय चौकशीअंती पाच पोलिसांवर कारवाई : तीन पोलीस सेवेतून बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 16:09 IST

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पाच पोलिसांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली. यापैकी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर एका महिला पोलिसास सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी रात्री केली.

ठळक मुद्देविभागीय चौकशीअंती पाच पोलिसांवर कारवाई : तीन पोलीस सेवेतून बडतर्फमहिला सक्तीने सेवानिवृत्त; एकाला खात्यातून केले कमी

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील पाच पोलिसांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली. यापैकी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर एका महिला पोलिसास सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी रात्री केली. कर्तव्यात बेशीस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणासह नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. एकाचवेळी पाचजणांवर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.कारवाई केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : पोलीस नाईक अमित दिलीप सुळगांवकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे या तिघांना सेवेतून बडतर्फ केले, तर महिला शिपाई समिना दिलावर मुल्ला यांना सक्तीने सेवानिवृत्त केले, तर पोलीस नाईक संतोष हरी पाटील यांना खात्यातून कमी केले.पोलीस नाईक अमित सुळगांवकर याची सध्या पोलीस मुख्यालयात नेमणूक केली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सेवेत असताना त्यांच्याकडे एक व्यक्ती त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज एका महिलेने दिला होता. त्याने तो स्व:तजवळ ठेवून वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला नाही. तसेच संबंधित संशयिताशी त्याने परस्पर संपर्क केला, असा त्याच्यावर ठपका ठेवला होता.याशविाय गांधीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस नाईक नारायण गावडे, महादेव रेपे या दोघांचे बेटिंग बुकीशी लागेबंधे, संबध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार तिघांचीही विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने तिघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.दरम्यान, राजारामपुरीतील महिला पोलीस समिना मुल्ला यांची दि. ८ डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यालयात बदली केली, त्यानंतर त्यांनी वैद्यकीय रजेवर असल्याचे कळविले, पण तसे प्रमाणपत्र सादर केले नाही.परवानगी न घेता सांगलीचा पोलीस जयसिंगपुरात हजरसांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक संतोष पाटील हे सध्या कागल येथे नेमणुकीस होते. ते सांगलीतून परवानगी न घेता जयसिंगपुरात आले. त्यांचे सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध नव्हते, असा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. विभागीय चौकशीअंती तेही दोषी आढळल्याने त्यांच्यावरही सक्तीने सेवानिवृत्ती व खात्यातून कमी करण्याच्या कारवाईचे आदेश दिल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

विभागीय चौकशीमध्ये पाचही जणांनी कर्तव्यात कसूर करून नियमांचा भंग केल्याचा त्यांच्यावर दोष ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.- डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर