विनामास्कची ३६२, मॉर्निंग वॉकची ३१३ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:02+5:302021-05-23T04:25:02+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शनिवारी दिवसभरात विनामास्कप्रकरणी ३६२ तर मॉर्निंग वॉकप्रकरणी ३१३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनचे उल्लंघन ...

Action against 362 people without mask and 313 people during morning walk | विनामास्कची ३६२, मॉर्निंग वॉकची ३१३ जणांवर कारवाई

विनामास्कची ३६२, मॉर्निंग वॉकची ३१३ जणांवर कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शनिवारी दिवसभरात विनामास्कप्रकरणी ३६२ तर मॉर्निंग वॉकप्रकरणी ३१३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध प्रकरणांत सुमारे ३ लाख २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. १३५ वाहने जप्त केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये शनिवारी पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. मॉर्निंग वॉक करणाऱ्या ३१३ जणांना दिवसभर हद्दीतील पोलीस ठाण्यात बसवून त्यांच्याकडून एकूण ३३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. विनामास्कप्रकरणी ३६२ जणांवर कारवाई करत ८१ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत १४६१ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार २०० रुपये दंड वसूल केला, तसेच १३५ वाहने जप्त केली. शिवाय, विनापरवाना आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल २८ जणांकडून ३१ हजार ५०० रुपये दंड वसूल करत करवाई केली.

जिल्ह्यातील आठवड्यातील एकूण कारवाई

- मास्क कारवाई : १९,८४५ जणांकडून ४४,०२,९६३ रुपये दंड वसूल.

- मोटार कारवाई : ७४,४३४ जणांकडून १,२६,९५,४०० रुपये दंड वसूल.

- दुचाकी जप्त : ६८११ वाहने

- आस्थापना कारवाई : १८० जणांकडून २,९७,८०० रुपये दंड वसूल.

- मॉर्निंग वॉक कारवाई : २१३४ जणांकडून ७,५३,१७० रुपये दंड वसूल

Web Title: Action against 362 people without mask and 313 people during morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.