कागलमध्ये २१ जणांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST2021-05-21T04:24:42+5:302021-05-21T04:24:42+5:30
कडक लाॅकडाऊन असतानाही सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या एकवीस जणांवर गुरुवारी कागल पोलिसांनी कारवाई केली. संबंधित लोक जयसिंगराव तलाव ...

कागलमध्ये २१ जणांविरोधात कारवाई
कडक लाॅकडाऊन असतानाही सकाळी माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या एकवीस जणांवर गुरुवारी कागल पोलिसांनी कारवाई केली. संबंधित लोक जयसिंगराव तलाव परिसरात फिरत होते. त्यांना कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून नगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सोडण्यात आले.
रविवारपासून शहरात कडक लाॅकडाऊन सुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकली ताब्यात घेण्याची कार्यवाही केल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. पण, सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. दोन दिवसांपूर्वी मुरगूड नाका परिसरात सहाजणांवर कारवाई केली होती. गुरुवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी जयसिंगराव पार्क ते तलावदरम्यान फिरत असलेल्या एकवीस जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल केलेला नाही. पण, यापैकी पुन्हा कोणी फिरताना आढळला, तर रीतसर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात येईल, असे नाळे यांनी स्पष्ट केले.
२० कागल मॉर्निंग वॉक
फोटो कॅपशन
कागल पोलिसांनी गुरुवारी जयसिंगराव तलाव परिसरात माॅर्निंग वाॅकसाठी फिरणाऱ्या २१ जणांवर कारवाई करीत पोलीस ठाण्याच्या आवारात आणले होते.