शिवनाकवाडीत अकरा जुगाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:59+5:302021-06-30T04:16:59+5:30

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार शिवनाकवाडी येथील उसाच्या शेतातील माणिक भिलवडे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती ...

Action against 11 gamblers in Shivnakwadi | शिवनाकवाडीत अकरा जुगाऱ्यांवर कारवाई

शिवनाकवाडीत अकरा जुगाऱ्यांवर कारवाई

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार शिवनाकवाडी येथील उसाच्या शेतातील माणिक भिलवडे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने बधुवारी रात्री छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालक अमित कांबळे पोलिसांना मिळून आला नाही. मात्र, जुगार खेळणारे राजू नेमा मगदूम, शिवाजी लक्ष्मण कोळी, राहुल रामचंद्र तेली (सर्व रा. अब्दुल लाट), स्वप्निल मारुती आरेकर, अविनाश धोंडीराम बरगाले (रा. शिरदवाड ता. शिरोळ), रमेश दगडू भिलवडे, जोतिराम कृष्णा संकपाळ, अविनाश दगडू कब्बुरे, जीवन दत्तात्रय उमराणी (सर्व रा. शिवनाकवाडी), आप्पासो भाऊ निगणुरे, सुनील रा. चौगुले (रा. मानकापूर, ता. चिकोडी, कर्नाटक) अशा अकरा जणांना ताब्यात घेतले आहे.

फोटो ओळ - शिवनाकवाडी (ता. शिरोळ ) येथे तीन पानी जुगार खेळणाऱ्यांना अकरा जणांना कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील.

Web Title: Action against 11 gamblers in Shivnakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.