नियम मोडणा-या सहा हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:56+5:302021-06-20T04:17:56+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या निर्बंधांत जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सुमारे सहा हजार वाहनावर कारवाई करण्यात आली, त्यापैकी १२२४ वाहने ...

नियम मोडणा-या सहा हजार वाहनांवर कारवाई
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या निर्बंधांत जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सुमारे सहा हजार वाहनावर कारवाई करण्यात आली, त्यापैकी १२२४ वाहने जप्त केली, तर उर्वरित वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे आठ लाख २६ हजार रुपये दंड वसूल केला. कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ही कारवाई केली.
कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यावर जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी पोलिसांनी कडक कारवाई केली. या दोन दिवसांत सुमारे ४६३० वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याद्वारे सुमारे ८ लाख २६ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणा-या ३६९९ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख ९४ हजार ४०० रुपये दंड वसूल केला. तर निर्धारित वेळेपेक्षा जादा वेळ आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ३३४ आस्थापनांवर कारवाई केली, त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ३५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.