रस्त्यावर लावलेल्या ३३ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:41+5:302021-01-08T05:20:41+5:30

नियंत्रण शाखा आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेले काही दिवस ही कारवाई सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी महिनो ...

Action on 33 vehicles parked on the road | रस्त्यावर लावलेल्या ३३ वाहनांवर कारवाई

रस्त्यावर लावलेल्या ३३ वाहनांवर कारवाई

नियंत्रण शाखा आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गेले काही दिवस ही कारवाई सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी महिनो न महिने चारचाकी गाड्या लावून ठेवण्यात आल्या आहेत. या विनावापर गाड्या नोटिसा दिल्यानंतरही अनेकांनी काढलेल्या नाहीत तर काही ठिकाणी या गाड्या कुणाच्या हे देखील समजून येत नाही. अखेर बेवारस वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली असून अशी ३३ वाहने उचलून प्रतिभानगर येथील के.एम.टी.च्या वर्कशॉपजवळील बुद्ध गार्डन येथे ठेवण्यात आली आहेत.

अजूनही अशी वाहने आढळून आली तर नागरिकांनी ९९२३७९९७०९ या व्हॉटस्‌ ॲप क्रमांकावर माहिती कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवण्यात येणार असून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या पोलीस आणि महापालिका प्रशानाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Action on 33 vehicles parked on the road