जिल्ह्यात १८१६ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:31+5:302021-04-30T04:31:31+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८१६ वाहनांवर कारवाई करण्यात ...

जिल्ह्यात १८१६ वाहनांवर कारवाई
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गुरुवारी जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८१६ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाहनधारकांकडून दोन लाख ३९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर १९७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
गेले दोन आठवडे जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी पुकारली आहे. संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी मोहिमेत वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणारी वाहने जप्तीचीही कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६१९ वाहनधारकांवर मोटार व्हेईकल ॲक्टनुसार गुन्हे नोंदविले, तसेच त्यांच्याकडून दोन लाख ३९ हजार २०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय १९७ वाहने जप्त करण्यात आली. जप्त वाहने आठवड्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून दंड भरून वाहनमालकांच्या ताब्यात देणार आहेत. याशिवाय पोलीस व महानगरपालिका यांच्या संयुक्ततेने केलेल्या विनामास्क प्रकरणी ४९६ जणांवर केसेस नोंदवून ७८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
वाहनावर केसेस (१६१९ संख्या) : २,३९,२०० रु. दंड
वाहने जप्त : १९७
विनामास्क केसेस (४९६ संख्या) : ७८,५०० रु. दंड