जिल्ह्यात ११७४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:21+5:302021-05-10T04:25:21+5:30

कोल्हापूर : कोरोना संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात रविवारी दिवसभरात नियमांचे उल्लघन करणाऱ्या ११७४ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख २९ ...

Action on 1174 vehicles in the district | जिल्ह्यात ११७४ वाहनांवर कारवाई

जिल्ह्यात ११७४ वाहनांवर कारवाई

कोल्हापूर : कोरोना संचारबंदी कालावधीत जिल्ह्यात रविवारी दिवसभरात नियमांचे उल्लघन करणाऱ्या ११७४ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख २९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. कारवाई केलेल्या वाहनांपैकी १९४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सत्र गेले महिनाभर सुरू आहे. रविवारी दिवसभरात ९८० वाहनांवर खटले दाखल करून २ लाख २९ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. तर विनामास्क फिरणाऱ्या ३२४ जणांवर कारवाई करीत ७५ हजार रुपये दंड वसूल केला. तसेच जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करीत ११ गुन्हे दाखल केले; तर २५ आरोपींवर कारवाई करून ६ लाख ३८ हजार २७९ रुपये दंड वसूल केला. ही कारवाई कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली.

Web Title: Action on 1174 vehicles in the district