शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी यांच्यासह २१ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 17:16 IST

सहा वर्षांनंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली

जयसिंगपूर : विधानभवनावर तूर, दूध, कांदा व कापूस फेकून सरकारचा निषेध केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेट्टीसह सर्वांचे गिरगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे आंदोलन करण्यात आले होते.२०१७ साली राज्यातील तूर, कांदा, दूध, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. वरील पिकांचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत होत्या. केंद्र व राज्य सरकारने फक्त घोषणाच केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०१७ साली विधानभवनावरती अर्थसंकल्पीय अधिवेशनात तूर, कांदा, दूध फेकून शासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरकारकडून राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हा गुन्हा गिरगाव न्यायालयात सुरू होता. सहा वर्षांनंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून शेट्टी यांच्यासह सतीश भय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम, जे. पी. परदेशी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज ॲड. संदीप कोरेगावे व ॲड. प्रवीण मेंगाने यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीCourtन्यायालय