५० रुपये न दिल्याबद्दल अ‍ॅसिड हल्ला

By Admin | Updated: August 2, 2014 00:43 IST2014-08-02T00:31:49+5:302014-08-02T00:43:03+5:30

तरुण जखमी : शाहूपुरीतील भाजी मार्केट परिसरातील घटना

Acid attack for not paying 50 rupees | ५० रुपये न दिल्याबद्दल अ‍ॅसिड हल्ला

५० रुपये न दिल्याबद्दल अ‍ॅसिड हल्ला

कोल्हापूर : पन्नास रुपये न दिल्याबद्दल तरुणावर अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना आज, शुक्रवारी शाहूपुरीतील भाजी मार्केट येथे सायंकाळी घडली. या अ‍ॅसिड हल्ल्यात विलास गोगे नायडू (वय २८, रा. कळंबा, ता. करवीर) हा भाजीविक्रेता जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाहूपुरी भाजी मार्केट येथे सायंकाळी विलास नायडू याच्याबरोबर संशयित मंगेश (भाई) (पूर्ण नाव समजू शकले नाही) याने जागेवरुन वाद घातला. जागा देण्यास नायडूने नकार दिल्याने मंगेश तेथून गेला व पुन्हा साथीदारांसमवेत दुचाकीवरून भाजी मंडईत आला. त्याने नायडूकडे ५० रुपयांची मागणी केली. त्यालाही नायडूने नकार दिल्याने मंगेश व त्याच्या साथीदारांनी नायडूच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले. त्यानंतर संशयित पसार झाले. रात्री उशिरा याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.

Web Title: Acid attack for not paying 50 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.