शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

व्यवहार बंद ठेवून आचार्यश्री विद्यासागरजीना विनयाजंली, कोल्हापूर,सांगली, बेळगांव जिल्हात शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 10:51 IST

Acharyashri Vidyasagarji: साहित्यिक, राष्ट्रभक्त, समाजसुधारक, सर्वात प्रभावशाली संत आचार्य श्री विद्यासागरजी मुनिमहाराज यांचे डोंगरगड  (छत्तीसगड,)येथे दि १७ रोजी रात्रौ २.३० वाजता सल्लेखनापूर्वक समाधी झाले.

- अभय व्हनवाडे रूकडी माणगाव - साहित्यिक, राष्ट्रभक्त, समाजसुधारक, सर्वात प्रभावशाली संत आचार्य श्री विद्यासागरजी मुनिमहाराज यांचे डोंगरगड  (छत्तीसगड,)येथे दि १७ रोजी रात्रौ २.३० वाजता सल्लेखनापूर्वक समाधी झाले. त्यांचे देश‌,परदेश‌मध्ये कोट्यावधी भक्तगण आहेत. माणगाव येथील जैन समाजातील श्रावक व श्राविकानी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून  आचार्यश्रीना विनयाजंली  व्यक्त केले. आचार्यश्रीचे समाधीचे वार्ता कोल्हापूर, सांगली, बेळगांव जिल्हात समजताच जैन समाजात दुःख कळा पसरले  आहे.

आचार्य श्री विद्यासागरजी यांचा जन्म १०ऑक्टोबर १९४६ रोजी सदलगा कर्नाटक  येथे असून  झाला असून सन १९६८ साली आचार्य श्री ज्ञानसागरजी महाराज  यांच्या कडून  अजमेर राजस्थान येथे दिक्षा घेतले होते.त्यानी आजन्म दही,दूध,हिरवे पालेभाजी,भाजी,मिठ,साखर, औषधे याचा पूर्णपणे त्याग केले होते. आहारामध्ये फक्त सात आठ ओंजळी‌ पाणी व आहार घेत होते.अंत्यत प्रभावशाली साधू  अशी त्यांची ख्याती होती.कोणतेही बँक  खाते ट्रस्ट नसतानाही कोट्यावधी रक्कमेचे  मंदिर,गोशाला, प्रतिभा स्थळ,अनाथ    मुलांच्या करिता  संस्कार केंद्र,विद्यालय निर्माण केले आहेत.

ते झोपण्यासाठी चटई सुध्दा वापरत नव्हते. अंगाच्या एकाच बाजूने झोपणे,आयुष्यभर न थुंकण्याचे त्यांचा‌ नियम होता. ते जवळपास ३००ते३५० साधू आणि साध्वी यांना दिक्षा दिले आहेत. विशेष म्हणजे  आचार्यश्री  यांच्या कडून  त्यांचे तीन बंधू,आई,वडील,दोन बहिणींनी दिक्षा घेवून  साधू मार्ग स्विकारला आहे. संघामध्ये शल्यविशारद,सनदी लेखापरीक्षक,आयएएस  पात्र व उच्चविद्याविभूषित दिक्षार्थी आहेत. मराठी, कन्नड, हिंदी, संस्कृत भाषेसह आठ भाषा त्यांना अवगत होती, त्यांची मूकमाटी हा संग्रह प्रचंड गाजला.

सल्लेखना प्रसंगी निर्यापक श्रमण मुनि श्री योगसागर जी, निर्यापक श्रमण मुनि श्री समतासागर जी, निर्यापक श्रमण मुनि श्री प्रसादसागर जी, मुनि श्री चन्द्रप्रभसागर जी, मुनि श्री पूज्यसागर जी, मुनि श्री निरामयसागर जी, मुनि श्री निस्सीमसागर जी, ऐ. श्री निश्चयसागर जी, ऐ. श्री धैर्यसागर जी, बा.ब्र. विनय भैया “सम्राट “ बण्डा(बेलई), ब्र तात्या भैया, ब्र अशोक भिलवड़े  उपस्थित होते. श्रावक श्रेष्ठी, दानवीर अशोक जी पाटनी ,आर के मार्बल किशनगढ, राजा भाई सूरत, प्रभात जी मुंबई, अतुल शाह पुणे, डॉ सुहास शाह मुंबई, डॉ स्वप्निल सिंघई  ,डॉ गौरव शाह पूर्णायु ,विनोद बडजात्या रायपुर उपस्थित  आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर