आचार्य शांतिसागर महाराजांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:20+5:302020-12-06T04:27:20+5:30
महावीर अध्यासन केंद्राचे आयोजन : विचारांचा जागर होणार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या ...

आचार्य शांतिसागर महाराजांवर
महावीर अध्यासन केंद्राचे आयोजन : विचारांचा जागर होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर महाराज यांच्या दीक्षा शताब्दीनिमित्त कोल्हापुरात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रातर्फे येत्या मंगळवारी व बुधवारी दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये शांतिसागर महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. परिषदेचा समारोप खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आचार्य शांतिसागर महाराजांनी मार्च १९२० मध्ये बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे परमपूज्य देवेंद्र कीर्ती महाराज यांच्याकडून निग्रंथ मुनिदीक्षा घेतली. त्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शताब्दी समिती स्थापन करून देशभर विविध सभा, समारंभ, विधी, विधाने, चरित्रनिर्मिती, ग्रंथनिर्मिती, यरनाळ येथे समाजोपयोगी प्रकल्प साकारले आहेत.
---------------------------------