राजकारणातून गावाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST2021-04-26T04:21:08+5:302021-04-26T04:21:08+5:30

पट्टणकोडोली : गावाबद्दल अपशब्द वापरल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न राजकारणातून झाल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे ...

Accused of using insults about the village through politics | राजकारणातून गावाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप

राजकारणातून गावाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप

पट्टणकोडोली : गावाबद्दल अपशब्द वापरल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकून मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न राजकारणातून झाल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य नम्रता माळी यांचे पती धोंडिराम माळी यांनी केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात धोंडिराम माळी यांनी अश्लील शिवीगाळ करत गावाचा उध्दार केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आली होती.

पट्टणकोडोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवार, १२ एप्रिल रोजी धोंडिराम माळी, सरपंच विजया जाधव यांचे पती अरुण जाधव आणि ठेकेदार उपस्थित होते. संबंधित ठेकेदाराने माळी यांच्या सांगण्यावरून दोन वर्षांपूर्वी काम केले होते. त्या कामाचे अद्याप बिल अदा करण्यात आलेले नाही. इतर कामाचे बिल अदा केले जाते, मात्र याच कामाचे जाणीवपूर्वक बिल अडवले जाते. या कारणावरून माळी यांनी यावेळी उपस्थितांना खडे बोल सुनावले. मात्र, काहींनी राजकारणातून माळी यांनी गावाबद्दल अपशब्द वापरल्याची पोस्ट जाणीवपूर्वक सोशल मीडियावर टाकून माळी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे.

Web Title: Accused of using insults about the village through politics