दुकान पेटविणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:13+5:302021-06-04T04:20:13+5:30

घराशेजारी राहणाऱ्या अमित कव्हेकर यांने त्याचे शेजारी प्रसाद वर्णे यांच्याशी असलेल्या किरकोळ कारणांचा राग मनात धरून त्यांचे बाजारपेठेत ...

Accused of setting shop on fire remanded in police custody for four days | दुकान पेटविणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

दुकान पेटविणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

घराशेजारी राहणाऱ्या अमित कव्हेकर यांने त्याचे शेजारी प्रसाद वर्णे यांच्याशी असलेल्या किरकोळ कारणांचा राग मनात धरून त्यांचे बाजारपेठेत असलेले महाराष्ट्र क्लॉथ साडी सेंटर नावाचे कापडाचे दुकान शुक्रवारी (दि.२१) मे रोजी रात्री दोनच्या सुमारास फिल्मी स्टाईलने डिझेल आणि रॉकेलचे गोळे टाकून पेटवून दिले. पण वेळीच आग विझविण्यात आल्याने दुकान जळून खाक झाले नाही. ही सल त्याच्या मनात राहिली होती. आठ दिवसांनी पुन्हा अमित कव्हेकर यांने शनिवारी (दि.२९) रोजी रात्री तशाच पद्धतीने रॉकेल आणि डिझेलचे बोळे टाकून दुकानाला आग लावली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अमित कव्हेकर याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.

आज गुरुवारी त्याला गारगोटी येथील न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Accused of setting shop on fire remanded in police custody for four days