जामिनावर सुटलेल्या आरोपीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:26 IST2020-12-06T04:26:29+5:302020-12-06T04:26:29+5:30
दरम्यान, नामदेव मोठे याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवला होता. यामध्ये आपण जीवन संपवत असून हुपरी येथील एका मोठ्या ...

जामिनावर सुटलेल्या आरोपीची आत्महत्या
दरम्यान, नामदेव मोठे याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर स्टेटस ठेवला होता. यामध्ये आपण जीवन संपवत असून हुपरी येथील एका मोठ्या चांदी उद्योजकाची चुकी असल्याचा आशय या स्टेटसमध्ये आहे, तर शुक्रवारी रात्री नामदेव व त्याच्या मित्रांचा अपघात झालेला होता. त्यामुळे या आत्महत्येबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सकाळी नामदेव मोठे याने आपल्या राहत्या घराच्या स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे नातेवाइकांना आढळून आले. या घटनेची माहिती नातेवाइकांनी हुपरी पोलिसांत दिली असून घटनेची वर्दी त्याचे चुलते नारायण मोठे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सावरतकर हे करीत आहेत. दरम्यान, नामदेव मोठे याने जानेवारी २०१९ मध्ये एका परप्रांतीय मजुराचा दगडाने ठेचून खून केला होता. त्याच्या जामिनासाठी गावातील एका राजकीय व्यक्तीने प्रयत्न केले होते. दोन महिन्यांपूर्वी त्याची जामिनावर न्यायालयाने सुटका केली होती. सुटकेनंतर नामदेवचा नाम्या भाई म्हणून बोलबाला झाला होता.
फोटो : ०५नामदेव मोठे