महिलेच्या खूनप्रकरणी आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:51+5:302021-04-30T04:29:51+5:30

गांधीनगर : गांधीनगर मुख्य रस्त्यावरील उचगाव हद्दीत झालेल्या केळी विक्रेती महिला मंजुळा हिच्या खूनप्रकरणी तिचा पती ...

Accused Gajaad in woman's murder case | महिलेच्या खूनप्रकरणी आरोपी गजाआड

महिलेच्या खूनप्रकरणी आरोपी गजाआड

गांधीनगर : गांधीनगर मुख्य रस्त्यावरील उचगाव हद्दीत झालेल्या केळी विक्रेती महिला मंजुळा हिच्या खूनप्रकरणी तिचा पती बसाप्पा शंकराप्पा बेळकरी (वय ४५, मूळ रा. उंडूर, ता. रानीबेन्नूर, जिल्हा हवेरी, कर्नाटक, सध्या रा. बेकर गल्ली, शाहुपुरी, कोल्हापूर) याला गांधीनगर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली. मंजुळा बेळकरी व तिचा पती बसाप्पा हे गांधीनगर मुख्य रस्त्यावरील उचगाव हद्दीत असलेल्या एका इमारतीमध्ये राहात होते. मंजुळाचे नामदेव नरसिंगराव जवळगे (रा. कागले मळा, गोकुळ शिरगाव) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय बसाप्पा याला होता. या आणि इतर कारणांवरुन मंगळवारी सकाळी बसाप्पा आणि मंजुळा या दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात बसाप्पाने धारदार शस्त्राने छातीवर, डोक्यावर वार करुन मंजुळाचे डोके दगडावर आपटले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, खून केल्यानंतर बसाप्पा पसार झाला. यानंतर शेजाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथक, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पथक यांनी पसार झालेल्या बसाप्पाला कर्नाटकातील उंडूर या त्याच्या मूळ गावातून ताब्यात घेतले.

चौकट:

हा खून मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास झाला होता. त्यानंतर संशयित आरोपी बसप्पा बेळेकरी हा कर्नाटकातील सुमारे चारशे किलोमीटर आपल्या मूळ गावी उंडूर येथे गेला होता. सायबर सेलच्या मदतीने त्याचे लोकेशन ट्रॅप करत तपास पथकाने त्याचा शोध घेतला.

फोटो : गांधीनगरातील गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात संशयित आरोपीला जेरबंद केले.

Web Title: Accused Gajaad in woman's murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.