शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:16 IST

सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा

कोल्हापूर : उचगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निकालावरून खासदार धनंजय महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे गट आमने-सामने आले आहेत. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी महाडीक गटाने केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकीय वाद नवीन नाही. यापूर्वी पाचगावचा सत्तासंघर्ष उफाळून आला होता. परंतु यावेळची पाचगावची निवडणूक शांततेत झाली. मात्र आता उचगाववरून वाद उफाळला आहे. उचगावमध्ये थेट सरपंचपदासाठी काँग्रेसचे मधुकर चव्हाण व भाजपचे सतीश मर्दाने यांच्यात लढत झाली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करण्यापूर्वीच मर्दाने समर्थकांनी जल्लोष केला.

संपूर्ण मतमोजणीनंतर चव्हाण यांना ६९ मतांनी विजयी घोषित केले. त्यावर, मर्दाने समर्थकांनी हरकत घेतली. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी मोर्चा काढत जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात निवेदन दिले. आता यावरून खासदार महाडीक व आमदार पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

..म्हणून आम्ही मोर्चे काढले नाहीत : सतेज पाटीलराजकारणात जय-पराजय होत असतो, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. गांधीनगर, कंदलगावसह तीन गावांत आमचा सरपंच झाला नाही म्हणून आम्ही तिथे मोर्चे काढले नाहीत, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला.लोकशाहीत परत निवडणुका घ्यायची पद्धत असती तर आम्ही २०१४ ची निवडणूक घ्या म्हटले असते. ईव्हीएममध्ये मतदानाची नोंद होत असते. मतमोजणीवेळी पोलिंग एजंट असतात. संशय घेण्यापेक्षा निकाल मान्य केला पाहिजे, लोकशाहीत हे चालत असतं. पराभव पचविण्याची ताकद पाहिजे.

अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिकविधानसभा २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचविण्याचे शिकवू नये, असा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी केला.आम्ही आतापर्यंत अनेक पराभव पचवून शिखरावर पोहोचलो आहोत. उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या.अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोपदेखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचे केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल, असे खासदार महाडीक यांनी म्हटले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक