शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

महापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, शिवसेना नेत्यांची मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 10:56 IST

Uday Samant- गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत गद्दारांना संधी नको, उदय सामंत यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेना नेत्यांची मते शिवसेनेची पहिली बैठक, गटतट विसरून सर्वजण उपस्थित

कोल्हापूर : गद्दारी करणाऱ्यांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे. अशा गद्दारांचा एकदा शोध घ्याच आणि त्यांना कडक शिक्ष करा. महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना संधी देऊ नका, अशा सूचना शिवसेनेच्या कोल्हापुरातील नेत्यांनी केल्या. संपर्कमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.कोल्हापूर शहर शिवसेनेमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात वाद असल्याचे जगजाहीर आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बैठक घेतली. या बैठकीवेळी ते एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षातील गद्दरांचा विषय चर्चेत आहे. यामुळेच हा विषय या बैठकीत उपस्थित झाला असण्याची शक्यता आहे.एकदिलाने काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्यात, असे आवाहन संपर्कमंत्री सामंत यांनी केले. यावेळी गट-तट बाजूला ठेवून निवडणूक लढल्यास शिवसेनेच्या २५ पेक्षा जास्त जागा निश्चित येतील, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती.बैठकीनंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पोषक वातावरण असून, भाजपला निवडणुकीत दूर ठेवण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने एकत्र निवडणूक लढविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतील. शिवसेनेतील गटबाजीमुळे आतापर्यंत पक्षाला तोटाच झाला आहे. आता मात्र महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने शहरातील गटबाजी संपवा, अशा सूचना शिवसेनेतील नेत्यांना केल्या. तसेच ८१ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करण्याचे सांगितले आहे.मतभेद आहेत, मनभेद नाहीतशहर शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटका पक्षाला बसत असल्याबाबत विचारले असता मंत्री उदय सामंत म्हणाले, शहर शिवसेनेमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. ही पक्ष जिवंत असण्याची लक्षणे आहेत. संपर्कप्रमुख दुधवडकर आणि शिवसेनेचे दोन्ही खासदार हा वाद मिटवतील आणि आम्ही महापालिकेची निवडणूक एकसंध राहून लढू.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर