शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तावरेवाडी येथील जवानाचा अपघाती मृत्यू; सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 20:43 IST

अपघाती मृत्यू झाल्याने तावरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

नेसरी: आजरा राज्य मार्गावर किणे (ता. आजरा) हद्दीत भरधाव अल्टो मोटर कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात तावरेवाडी ( ता. गडहिंग्लज ) गावचे जवान मसणू धोंडीबा मणगुतकर (वय 32 वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाला. नेसरी व आजरा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून सुट्टीवर आलेल्या जवानाचा पहिल्याच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने तावरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, जवान मणगुतकर हे एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते. आपल्या मामाच्या मुलीचे लग्न उद्या ( गुरुवारी) असल्याने त्यांनी आपल्या अल्टो गाडीने ( एम एच-06-ए एस-8556) आईला हडलगे गावी सोडून आजरा कडे जात असताना  गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याकडेच्या झाडावर जोरात धडकली. त्यात त्यांचा गंभीर जखमी होवून जागीच मृत्यु झाला. या अपघाताची बातमी समजताच तावरेवाडी ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेने त्यांना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या अपघाताची माहिती त्यांच्या वरिष्ठ सैन्य दलातील अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. दिवसभर तावरेवाडी ग्रामस्थ व परिसरातील आजी माजी सैनिक नेसरी ग्रामीण रुग्णालयात उपास्थित होते. त्यांचे   येथील तुकाराम कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात बी ए  चे शिक्षण झाले होते. मसनु हे अविवाहित होते.  त्यांच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे तावरेवाडी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद नेसरी पोलिसात झाली असून अधिक तपास ए. एस्. तडवी व सागर कांबळे करीत आहेत.- मसणू  मनगुतकर यांना सर्वजण अभिषेक या नावाने बोलवत असत. अतिशय सामान्य कुटुंबातील मसणू यांना पहिल्यापासून सैन्याची आवड होती. २०१८ साली जिद्दीने ते सैन्यात भरती झाले होते. 

- त्यांनी शीख रेजीमेंट मधून लेह लडाख, लखनौ या ठिकाणी ५ वर्षे सेवा बजावली,  सध्या ते विशाखापट्टनम येथे सेवेत होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर