कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक अपघात : दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:35+5:302021-01-13T05:03:35+5:30
अशोक महादेव पोवार रा. मलकापूर याने ट्रक निष्काळजीपणाने चालवत तरुणांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची नोंद ...

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ नजीक अपघात : दोन तरुणांचा जागीच मृत्यू
अशोक महादेव पोवार रा. मलकापूर याने ट्रक निष्काळजीपणाने चालवत तरुणांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालक अशोक पोवार यास अटक केली; पण लगेचच त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार विशाल याचा दहा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. तो बावडा येथे मामाकडे राहायला गेला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली होती, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली. नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून, त्याला एक लहान मुलगा आहे. नितीन व विशाल हे दोघे काल रात्री दुचाकीवरून विशाळगडाकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे आशिष लाॅजच्या समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जोराची धडक दिली. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे.