बाळेघोल येथे धोकादायक वळणावर अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:44+5:302021-06-23T04:16:44+5:30

करंबळी येथील दोघे व गडहिंग्लज येथील दोघे असे चौघेजण (एमएच ०९ ईके ८८५४) या चारचाकी गाडीने कोल्हापूरला चालले होते. ...

Accident on a dangerous turn at Baleghol | बाळेघोल येथे धोकादायक वळणावर अपघात

बाळेघोल येथे धोकादायक वळणावर अपघात

करंबळी येथील दोघे व गडहिंग्लज येथील दोघे असे चौघेजण (एमएच ०९ ईके ८८५४) या चारचाकी गाडीने कोल्हापूरला चालले होते. राष्ट्रीय महामार्ग कोगनोळीजवळ बंद असल्याने गडहिंग्लज-कापशी मार्गे कोल्हापूरला चालले होते. दरम्यान बाळेघोल नजीक असलेल्या धोकादायक वळण व पुलाचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडी पुलाचा कठडा तोडून थेट ओढ्यात कोसळली.

या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून जखमींना ताबडतोब रुग्णवाहिकेतून गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

फोटो : बाळेघोल (ता. कागल) येथील धोकादायक वळणावर असलेल्या पुलावरून कठडा तोडून थेट आंबे ओहोळ ओढ्यात कोसळलेली चारचाकी गाडी.

फोटो : सार्थक फोटो कापशी

Web Title: Accident on a dangerous turn at Baleghol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.