करवीर तालुक्यात सूर्यफूल काढणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST2021-04-27T04:25:07+5:302021-04-27T04:25:07+5:30

यंदाच्या हंगामास सूर्यफुलास उत्तम हवामान लाभल्याने सूर्यफूल पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यावर्षी विविध सुधारित सूर्यफूल बियांणाची शेतकऱ्यांनी पेरणी ...

Acceleration of sunflower harvesting in Karveer taluka | करवीर तालुक्यात सूर्यफूल काढणीस वेग

करवीर तालुक्यात सूर्यफूल काढणीस वेग

यंदाच्या हंगामास सूर्यफुलास उत्तम हवामान लाभल्याने सूर्यफूल पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यावर्षी विविध सुधारित सूर्यफूल बियांणाची शेतकऱ्यांनी पेरणी केली . शेतीमध्ये खोडवा ऊस पीक क्षेत्र व मोकळ्या जमिनीमध्ये सूर्यफुलांची लागवड करण्यात आली होती .

बाजारपेठेत गोड्या तेलाचे भाव प्रचंड स्वरूपात वाढू लागल्याने ग्रामीण भागात सूर्यफूल , भुईमूग या पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे .

फोटो ओळ - करवीर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून शेतीमध्ये उन्हाळी हंगामातील सूर्यफूल काढणीस वेग आला आहे .

Web Title: Acceleration of sunflower harvesting in Karveer taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.