शहरात लसीकरणास वेग, ५०२२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST2021-09-07T04:30:14+5:302021-09-07T04:30:14+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे ५०२२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महापालिका प्रशासनास मोठ्या ...

शहरात लसीकरणास वेग, ५०२२ नागरिकांचे लसीकरण
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे ५०२२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महापालिका प्रशासनास मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. आज, मंगळवारी १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
सोमवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे ५०२२ नागरिकांचे झाले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर ३० व १८ ते ४४ वर्षांपर्यंत ३६३५ नागरिकांचा, तसेच ४५ ते ६० वर्षांपर्यंत ८९३ नागरिकांचे व ६० वर्षांवरील ४६४ नागरिकांचा समावेश आहे.
आज, मंगळवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टेशन केले आहे अशांना महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिध्दार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.
उद्या, बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत १८ वर्षांवरील दिव्यांग बांधवांचे कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत अशा दिव्यांग बांधवांनी जवळच्या महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन दुसऱ्या डोसकरिता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.