शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Navratri : अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 15:06 IST

अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली व सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात आली.

ठळक मुद्देअंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेगदर्शन मंडप उभारणीसह महाकाली, सरस्वती, गणपती चौकाची स्वच्छता

कोल्हापूर : अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंडप उभारणीसह महाकाली व सरस्वती मंदिर, गणपती चौकाची स्वच्छता करण्यात आली.देवस्थान समितीतर्फे शहरातील विविध सात ठिकाणी श्री अंबाबाईच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. समितीतर्फे शहरातील सात प्रमुख ठिकाणी आठ बाय दहाचे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे भक्तांना मंदिरात न येताही देवीचे दर्शन होणार आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी अंबाबाईच्या मंदिरात मोठ्या उत्साहात केली जात आहे.

देवस्थान समितीचे सदस्य आणि सर्व कर्मचारी मंदिराची स्वच्छता, दुरुस्ती, रंगकाम अशा कामांमध्ये व्यस्त आहेत. अंबाबाईचे दर्शन सर्व भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित व्हावे यासाठी समितीकडून योग्य ते नियोजन व व्यवस्थापन केले जात आहे. केवळ मंदिरात येणाऱ्या भक्ताला नाही, तर शहरातील प्रत्येक नागरिकाला देवीची पूजाअर्चा व दर्शन व्हावे यासाठी समितीकडून डिजिटल माध्यमांचाही वापर केला जात आहे. रविवारी दुपारपर्यंत मंदिराच्या पूर्वेकडील सरलष्कर भवनासमोरील मुख्य दर्शनरांगेच्या मंडप उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी देवस्थानचे कर्मचारी व काही स्वयंसेवकही राबत आहेत.गतवर्षीप्रमाणे शहरातील बिंदू चौक, घाटी दरवाजा,मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, दर्शन मंडप परिसर, आदी सात ठिकाणी आठ बाय दहा फुटांचे एल.ई.डी. स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या स्क्रीनद्वारे या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना देवीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी दिली.सेवा यंदाहीगेली १६ वर्षे मुंबई येथील संजय मेंटेनन्स कंपनीकडून अंबाबाईला स्वच्छता सेवा अर्पण केली जाते. यंदाही या सेवेस सुरुवात झाली. संजय मेटेनन्सच्या २० कर्मचाऱ्यांनी या कामास सुरुवात केली.सकाळी या कर्मचाऱ्यांनी प्रथम शिखरांसह सरस्वती मंदिर, महाकाली मंदिर, गणपती चौक यांसह अंबाबाई परिसराची पाणी मारून स्वच्छता केली.

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरNavratriनवरात्री