कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांकडून तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 01:58 PM2020-09-15T13:58:16+5:302020-09-15T14:00:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखतीच्या पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या प्राचार्य, प्राध्यापकांची तयारी वेगाने सुरू आहे. ...

Accelerate preparation from those eligible for the Vice-Chancellor's interview | कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांकडून तयारीला वेग

कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांकडून तयारीला वेग

Next
ठळक मुद्देसादरीकरण, मार्गदर्शनासाठी भेटीगाठी शिवाजी विद्यापीठ कुलगुरू निवड प्रक्रिया



लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखतीच्या पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या प्राचार्य, प्राध्यापकांची तयारी वेगाने सुरू आहे. निवड समितीसमोरील सादरीकरण दमदारपणे व्हावे, यासाठी तज्ज्ञांच्या भेटीगाठी त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. या कुलगुरुपदासाठी १६९ जणांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी झाल्यानंतर कुलगुरू शोध समितीने मुलाखतीच्या पहिल्या फेरीसाठी २५ जणांची नावे पक्की केली आहेत. त्यांच्या मुलाखती दि. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या ऑनलाईन मुलाखतीसाठी निवड झालेल्या २५ जणांना प्रत्येकी एक तासाचा वेळ देण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांना विद्यापीठाचे व्हिजन, स्वत:ची वाटचाल, आदींबाबतचे सादरीकरण करावयाचे आहे. या मुलाखतीपूर्वी त्यांना पदवी, पदव्युतर पदवीची प्रमाणपत्रे, नियुक्तीचे पत्र आणि कुलगुरुपदासाठी कसे पात्र आहात याबाबतची दोन पानांची माहिती, तीन व्यक्तींची संदर्भपत्रे, आदी कागदपत्रे सादर करावयाची आहेत. त्याची तयारी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवार प्राचार्य, प्राध्यापकांकडून सुरू झाली आहे. यापूर्वी कुलगुरुपदासाठी पात्र ठरलेले, मुलाखत देणाऱ्यासह या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटीगाठी त्यांच्याकडून सुरू झाल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जमा करण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
(संतोष मिठारी)

Web Title: Accelerate preparation from those eligible for the Vice-Chancellor's interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.