अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST2021-03-13T04:43:41+5:302021-03-13T04:43:41+5:30

मलकापूर : कोळगाव (ता. शाहूवाडी) येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी छेडछाड व लैंगिक अत्याचार केल्याची ...

Abuse of a minor girl, filing a case against one | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाविरोधात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकाविरोधात गुन्हा दाखल

मलकापूर : कोळगाव (ता. शाहूवाडी) येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी छेडछाड व लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाहूवाडी पोलिसांनी अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन संशयितास सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगाव येथील रहिवासी संशयित आरोपी हा गेल्या तीन महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग करीत होता. बुधवारी सकाळी पीडित मुलगी किराणा दुकानाकडे जात असताना तिचा पाठलाग करणाऱ्या संशयित अनिकेत याने गावातील सोसायटी परिसरात पीडित मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे त्याने वर्तन केले.

दरम्यान याचा जाब विचारायला गेलेल्या फिर्यादीला संशयिताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पीडितेच्या अन्य नातलगांनी आरोपीची बेदम धुलाई करीत त्याला शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील हे करीत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl, filing a case against one