शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

शाहूवाडीमधील पाणी योजनेस साडेसात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सात कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन, पणन, स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. शाहूवाडी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर जि. प. सदस्य विजय बोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती .यावेळी खोत म्हणाले, शासनाने शेतकºयांसाठी विविध योजना आणल्या आहेत. चालू वर्षी उसाची एफआरपी वाढल्यामुळे शेतकºयांना टनाला तीन हजार रुपयांच्या पुढे दर मिळणार आहे. दुधाचा खरेदी दर वाढविला आहे .आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच कृषी विभागाला जास्त प्रमाणात निधी देण्याची मागणी केली .सर्जेराव पाटील म्हणाले, तालुक्याच्या कोरडवाहू गावात छोटे पाझर तलाव करणे गरजेचे आहे. राजकारण विरहित काम केले तर गावांना पाणी मिळेल. परिणामी, कोणत्याही गावाला पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही.तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी तालुक्यातील पाच गावांचे आॅनलाईन उतारे मिळण्याची सोय झाल्याचे सांगितले.यावेळी सागर खोत, सुरेश पाटील, सभापती स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, जि. प. सदस्या आकांक्षा पाटील, हंबीरराव पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नियोजन मंडळाचे सदस्य नगरसेवक राजू प्रभावळकर, तहसीलदार चंद्रशेखर सानप, उपविभागीय अधिकारी अजय पवार, उपअभियंता एम. बी. पवार, जे. डी. काटकर, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, गटविकास अधिकारी डॉ. उदय पाटील, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार उपस्थित होते. चंद्रशेखर सानप यांनी आभार मानले.