शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश, रंकाळा परिसर, पडळ येथे रुग्णालयावर छापे; तिघे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:18 IST

गर्भपात करणाऱ्या या रॅकेटकडून शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरु आहे, आजपर्यत कितीजणांचे गर्भपाताचे प्रकार घडले आहेत. याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

कोल्हापूर / यवलूज : शैक्षणिक अर्हता व वैद्यकिय परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास पर्दाफाश केला. कोल्हापुरात अंबाई टॅक परिसरतील हरिओमनगर तसेच पडळ (ता. पन्हाळा) येथील रुग्णालयावर छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली. एक संशयित एजंट पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पहाटे पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.बोगस डॉक्टर उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६ रा. करंजफेन, ता. शाहूवाडी. सद्या रा. हरिओम नगर, अंबाई टॅंक परिसर, रंकाळा तलाव परिसर, कोल्हापूर). डॉ. हर्षल रविंद्र नाईक (४० रा. प्रतिराज गार्डन, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर), दत्तात्रय महादेव शिंदे (४२ रा. पडळ, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे असून एजंट भरत पोवार याने पोबारा केला.जिल्हाधिकारी राहूल रेखावर, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने हा गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.अटक केलेल्या दोन बोगस डॉक्टरांसह तिघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. गर्भपात करणाऱ्या या रॅकेटकडून शहरासह जिल्ह्यात किती काळापासून हा प्रकार सुरु आहे, आजपर्यत कितीजणांचे गर्भपाताचे प्रकार घडले आहेत. याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.शासकिय रुग्णालयातील निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल वेदक, पन्हाळा पंचायत समितचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुनंदा गायकवाड, सहायक पोलीस निरीषक श्रध्दा आंबले, महीला पोलीस रुपाली यादव यांच्या पथकाने या गर्भपात करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी