शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

Santosh Trophy: लमाणाचं प्वार निघालं सौदी अरेबियाला.!, गुलबर्गा ते रिहाद व्हाया गडहिंग्लज असा प्रेरणादायी प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:41 IST

गेल्या मे महिन्यापर्यंत अभिषेक आई- वडिलांना खोदकामात मदत करायचा. पहाटे अडीच तास सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक

राम मगदूमगडहिंग्लज : गरीब लमाण कुटुंबातील अभिषेक 'संतोष ट्रॉफी' राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सौदे अरेबियाला रवाना झाला. गुलबर्गा ते सौदी अरेबियाची राजधानी रिहाद व्हाया गडहिंग्लज असा त्याचा प्रेरणादायी प्रवास आहे.अभिषेक शंकर पोवार असे या जिगरबाज तरुणाचं नाव आहे. गडहिंग्लज युनायटेडचा प्रतिभावान युवा फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अभिषेक'ने संतोष ट्रॉफीच्या पर्दापणातच अर्धा डझन गोल करून भारतीय फुटबॉल वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. किंबहुना, त्याच्या निमित्ताने गडहिंग्लज फुटबॉल केंद्राची दखल व्यावसायिक फुटबॉल संघानाही घ्यावी लागली आहे.कर्नाटकातील विजापूर - गुलबर्गा जिल्ह्यातून अनेक लमाण कुटुंबं उदरनिर्वाहासाठी गडहिंग्लजला आले आहेत. त्यापैकीच एका कुटुंबात त्याचा जन्म झाला, त्याचे शिक्षणही इथेच झाले. म्हणूनच, त्याच्या यशाने लमाण बांधवांसह साऱ्या गडहिंग्लजकरांनाही आनंद झाला आहे.दरवर्षी दिवाळीत येथील एम.आर.हायस्कूलच्या मैदानावर भरणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धांमुळेच अभिषेकला फुटबॉलची गोडी लागली. त्याची गती लक्षात घेऊन 'गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूल'ने त्याला १० वर्षांचा असताना दत्तक घेतले. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. चपळ व काटक अभिषेकने शालेयस्तरापासूनच मैदान गाजवायला सुरवात केली. बॅ. नाथ पै विद्यालय, गडहिंग्लज हायस्कूल या संघांना त्याने एकहाती स्पर्धा जिकूंन दिल्या. चेंडूवरील अफलातून नियंत्रण आणि सतत धावण्याची त्याची क्षमता उपयुक्त ठरली.बेळगाव युनायटेड संघातूनही त्याने बंगळूर १८ वर्षीय लिगमध्ये गोलचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात बंगळूरच्या किक स्टार्ट एफसीतून त्याने ८ गोल नोंदवले. या कामगिरीमुळेच तो कर्नाटकाकडून संतोष ट्रॉफीसाठी निवडला गेला. दिल्ली आणि भुवनेश्र्वर येथे झालेल्या संतोष ट्रॉफी पात्रता व मुख्य फेरीत त्याने कर्नाटकाकडून अर्धा डझन गोल मारले. खेलो इंडिया स्पर्धेतही त्याने पाच गोल करुन संघाला उपविजेतपद मिळवून दिले. यंदा प्रथमच संतोष ट्रॉफी उपांत्य आणि अंतिम सामना रिहाद येथील किंग फहाद आंतरराष्ट्रीय स्टेडिमयवर बुधवारी ( १) होत आहे.संतोष ट्रॉफीतील  कामगिरीमुळे  केरळ, बंगळूर, कोलकत्ता, चेन्नईतील व्यावसायिक संघानीही 'अभिषेक'साठी संपर्क साधला आहे. त्यामुळे 'फुटबॉल पंढरी गडहिंग्लज' पुन्हा चर्चेत आली आहे.

पहाटे सराव... दिवसभर कामगेल्या मे महिन्यापर्यंत अभिषेक आई- वडिलांना खोदकामात मदत करायचा. पहाटे अडीच तास सराव आणि दिवसभर कुटुंबियाना मदत असेच त्याचे वेळापत्रक होते. अंगमेहनतीचे काम करूनही न कंटाळता सातत्याने केलेला सराव त्याला अधिक काटक बनविण्यास कारणीभूत ठरला.

‘अभिषेक'ने यंदा स्वप्नवत कामगिरी केली.गडहिंग्लज युनायटेडच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले. उपात्यंफेरीतही त्याने विजय मिळवावा,हीच अपेक्षा -  मल्लिकार्जून बेल्लद अध्यक्ष- युनायटेड फुटबॉल,गडहिंग्लज

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल