अभिनव देशमुख, मोहितकुमार गर्गे सर्वांत लोकप्रिय पोलीस अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST2021-03-30T04:15:23+5:302021-03-30T04:15:23+5:30

कोल्हापूर : भारतीय पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात सर्वांत लोकप्रिय ठरलेल्या पन्नास अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सोमवारी ...

Abhinav Deshmukh, Mohit Kumar Garge Most Popular Police Officer | अभिनव देशमुख, मोहितकुमार गर्गे सर्वांत लोकप्रिय पोलीस अधिकारी

अभिनव देशमुख, मोहितकुमार गर्गे सर्वांत लोकप्रिय पोलीस अधिकारी

कोल्हापूर : भारतीय पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात सर्वांत लोकप्रिय ठरलेल्या पन्नास अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. या यादीत कोल्हापूरचे तत्कालीन व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्गे यांचा समावेश आहे.

लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील डॉ. देशमुख, डॉ. गर्गे यांच्यासह विनिता साहू (डीसीपी, नवी मुंबई), मोक्षदा पाटील (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद) या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

फेम इंडिया मॅगझिन एशिया आणि पीएस यू वाॅच यांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकप्रिय ठरलेल्या भारतातील पन्नास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांसह डॉ. प्रीतीदरसिंग, अजय यादव (छत्तीसगड), कार्तिकेस (तेलंगणा), विक्रमजितसिंग दुग्गल (पंजाब), जोगिंदरसिंग कुमार (उत्तर प्रदेश), सेन्थिल अवोदाई (उत्तराखंड), अमनजित कौर (आसाम), दीपककुमार झा (छत्तीसगड), ॲटो अल्फोन्स (दिल्ली), पंकज कुमारसिंग (गोवा), प्रीती चंद (राजस्थान), विधी चौधरी (गुजरात), बबलू कुमार (उत्तर प्रदेश) या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Abhinav Deshmukh, Mohit Kumar Garge Most Popular Police Officer