अभिजित तायशेटे यांचा वाढदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST2021-04-01T04:25:37+5:302021-04-01T04:25:37+5:30

राधानगरी : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांचा वाढदिवस राधानगरी येथे उत्साहात साजरा ...

Abhijit Taishete's birthday in excitement | अभिजित तायशेटे यांचा वाढदिवस उत्साहात

अभिजित तायशेटे यांचा वाढदिवस उत्साहात

राधानगरी : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे यांचा वाढदिवस राधानगरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या रक्तदान शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. जेनेसीस इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनी अभिजित तायशेटे यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यामध्ये श्रीमंत शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, मालोजीराजे, आमदार प्रकाश अबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, अरुण डोंगळे, राहुल देसाई, अर्जुन आबिटकर, अंबरीश घाटगे, विलास कांबळे, बाळासो खाडे, बाजीराव खाडे, पी. डी. धुंदरे, कल्याण निकम, वीरेंद्र मंडलिक, उदय पाटील सडोलीकर, बाबा नांदेकर, तसेच राधानगरी तालुक्यातील विविध दूध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Abhijit Taishete's birthday in excitement