अब्दुललाट तलावाचे रूप पालटणार
By Admin | Updated: March 4, 2015 23:51 IST2015-03-04T23:23:23+5:302015-03-04T23:51:58+5:30
गाळ काढण्यास सुरुवात : दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

अब्दुललाट तलावाचे रूप पालटणार
अब्दुललाट : येथील सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक तलावाला आता गतवैभव प्राप्त होणार आहे. त्यासाठी अब्दुललाट ग्राम तलाव संवर्धन व सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे सल्लागार सदस्य कुलभूषण बिरनाळे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक गाव तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी सरपंच शानाबाई कोळी, आप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य दादासाहेब सांगावे, सुरेश शेडबाळे, एस. के. पाटील, संजय कोळी, उपसरपंच मिलिंद कुरणे, कुसूम परीट, देवेंद्र कांबळे, जयश्री पाटील, रमेश टिकणे, जयश्री आवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील सहकारी संस्था, देणगीदार यांच्या आर्थिक मदतीतून तसेच शासनाकडूनही निधी उपलब्ध करून तलावाचा कायापालट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तलाव दुर्लक्षित प्रश्नी ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला होता.