अब्दुल कलाम यांची क्षेपणास्त्र दूरदृष्टी मोलाची : काशिनाथ देवधर

By Admin | Updated: January 16, 2015 00:15 IST2015-01-15T23:54:38+5:302015-01-16T00:15:07+5:30

भारत आता पाचव्या स्थ्पोखरणच्या चाचणीचा थांगपत्ताही जगाला विशेषत: अमेरिकेला लागू न देता भारत अणवस्त्रांच्या दृष्टीनेही तयार असल्याचे जगाला दाखवून दिले

Abdul Kalam's missile foresight prompts: Kashinath Deodhar | अब्दुल कलाम यांची क्षेपणास्त्र दूरदृष्टी मोलाची : काशिनाथ देवधर

अब्दुल कलाम यांची क्षेपणास्त्र दूरदृष्टी मोलाची : काशिनाथ देवधर

कोल्हापूर : पोखरण अणुचाचणी असो की, चीनसह रशियाच्या मॉस्कोचा वेध घेणारी अग्नी क्षेपणास्त्रांची निर्मिती असो, मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचे योगदान नेहमीच मौलिक ठरले आहे, असे प्रतिपादन डीआरडीओचे समूह निदेशक काशिनाथ देवधर यांनी केले़
ते येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वि़ स़ खांडेकर व्याखयानमालेत भारतीय क्षेपणास्त्र या विषयावर बोलत होते़ देवधर म्हणाले, पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी या क्षेपणास्त्रामुळे भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वयंपूर्णता सिध्द केली आहे़ पंधरा वर्षात आंतरराषट्ीय दर्जाची क्षेपणास्त्रे सोडणारया देशांच्या यादीमध्ये भारत आता पाचव्या स्थ्पोखरणच्या चाचणीचा थांगपत्ताही जगाला विशेषत: अमेरिकेला लागू न देता भारत अणवस्त्रांच्या दृष्टीनेही तयार असल्याचे जगाला दाखवून दिले आहे़ स्वत:चे उपग्रह अवकाशात पाठवण्याबरोबरच प्रगत देशांचे उपग्रहही भारत पाठवत आहे़ त्यामुळे क्षेपणस्त्रांच्या बाबतीत भारताकडे जगही आश्वासक दृष्टीने पहात आहे, असे मतही देवधर यांनी व्यक्त केले़
यावेळी देवधर यांनी पृथ्वी, अग्नि, त्रिशूल, नाग, आकाश, ब्राम्होस, धनुष्य या क्षेपणास्त्रांची वैशिष्टये व उपयुक्तता आणि वापर याची माहिती देणारे प्रेंझेटशन सादर केले़ यावेळी विजय नागपूरकर, अनंत जयतीर्थ, प्रा़ डॉ़ श्रीकृष्ण साळोखे, उदय सांगवडेकर, अभिजीत भोसले आदी उपस्थित होते़ वक्तयांचा परिचय प्रताप साळुंखे यांनी केला़ प्रास्ताविक विकास परांजपे यांनी केले़ सूत्रसंचालन नदंकुमार मराठे यांनी केले़ (प्रतिनिधी)

Web Title: Abdul Kalam's missile foresight prompts: Kashinath Deodhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.