सुपरव्होट पानासाठी संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:58+5:302021-01-13T05:01:58+5:30
दत्तवाड : येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष यड्रावकर ...

सुपरव्होट पानासाठी संक्षिप्त
दत्तवाड : येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष यड्रावकर गटाचे नूर कासिम काले यांच्यात सरळ लढत होत आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी येथे प्रचार केला, तर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन, ते प्रचारावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केल्याने दत्तवाडसह संपूर्ण तालुक्यात या लढतीची चर्चा सुरू आहे.
-------------------
खर्चाचा हिशेब देण्यासाठी धावपळ
शिरोळ : एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत प्रत्येक बाबींवर केलेल्या खर्चाचा हिशेब दररोज द्यावा लागत आहे. प्रचारासोबत खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
----------------------
प्रतिस्पर्धी उमेदवारावर नजर
जयसिंगपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारात रंगत वाढली आहे. गावपातळीवर वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांशी संपर्क करीत आहेत. विकास कामांच्या आश्वासनांचा पाऊस पडत आहे. सर्वच उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदारावर नजर ठेवून आहेत. तालुक्यात ४०१ जागांसाठी ९९२ उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत.